Rohit Pawar : रोहित पवार यांचा ट्वीट करत गिरीश महाजन यांच्यावर आरोप, म्हणाले...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Rohit Pawar ) रोहित पवार यांनी ट्वीट करत गिरीश महाजन यांच्यावर आरोप केला आहे. रोहित पवार म्हणाले की, भाजपचे तथाकथित #संकटमोचक गिरीश महाजन यांच्या जामनेर शहरात दडपशाहीने वंचितसह समविचारी पक्षाच्या उमेदवारांना सत्तेचा गैरवापर करत दडपशाही मार्गाने बळजबरी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला भाग पाडले गेलं, ही आहे बिनविरोध निवडणुकांची वस्तूस्थिती!'
'बिनविरोधसाठी एवढा अट्टहास का? विकली गेलेली यंत्रणा आणि षंढ असलेला निवडणूक आयोग तर यावर काही बोलणार नाही, पण अशाने लोकशाही अखेरच्या घटका मोजत नाही का? यावर सर्वसामान्य जनतेने मात्र नक्कीच विचार करायला हवा!'
'दडपशाही आणि गुंडगिरी करून लोकशाहीची हत्या करू पाहणाऱ्या, लोकशाहीला घातक असणाऱ्या गिरीश महाजन यांच्यासारख्या बेफाम मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घेऊन, त्यांचे असले चाळे खपवून घेतले जाणार नाहीत असा स्पष्ट संदेश द्यावा.' असे रोहित पवार म्हणाले.
Summery
बिनविरोध निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा विजयी झाल्या
आमदार रोहित पाटलांनी भाजपवर ट्वीट करत निशाणा साधलाय,
रोहित पवार नेमकं काय म्हणालेत?
