Nagar Panchayat Election Result 2022 : रोहित पवारांची कर्जतमध्ये बाजी, राम शिंदेंना मोठा धक्का

Nagar Panchayat Election Result 2022 : रोहित पवारांची कर्जतमध्ये बाजी, राम शिंदेंना मोठा धक्का

Published by :
Published on

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ९३ नगरपंचायतींमधील ३३६ जागांसाठी १८ जानेवारीला पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत सरासरी ८१ टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली होती. त्यानंतरच अहमदनगरच्या कर्जत नगरपंचायतीचा निकाल हा राज्यात सर्वात पहिल्यांदा समोर आला. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारल्याची आकडेवारी समोर आली आहे.

कर्जत नगरपंचायतीसाठी आतापर्यतच्या निकालानुसार राष्ट्रवादी (NCP), कॉग्रेस (congress) व मित्रपक्षांनी एकुण 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवला आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकहाती सत्ता मिळवली आहे. कर्जकमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यात प्रतिष्ठेची लढत होती. कर्जतमध्ये १२ जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला आहे. तर भाजपचा एका जागेवर विजय झाला आहे. माजी मंत्री असलेल्या राम शिंदेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात अतिशय चुरशीची लढत म्हणून या लढतीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते.

एकुण १७ पैकी १२ जागांवर राष्ट्रवादीने सरशी घेतली असल्याची आकडेवारी समोर येत आहे. तर भाजपला मात्र अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. कर्जतमध्ये रोहित पवार विरूद्ध राम शिंदे अशी प्रतिष्ठेची लढत झाली होती. याठिकाणी दोन्ही पक्षाच्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी तळ ठोकला होता. या निवडणूकीमध्ये आरोप प्रत्यारोपही मोठ्या प्रमाणात झाल्याचे पहायला मिळाले. राज्यातील नगर पंचायतीच्या निकालांमध्ये या दोन प्रमुख नेत्यांमधील लढतीमुळेच ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. या निकालाकडे राज्यातील नेत्यांचे आणि राजकीय पक्षांचेही लक्ष लागले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com