महाराष्ट्र
Bhiwandi : भिवंडीत प्रतिभा पाटील यांच्या सभेत राडा; निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
अनेक सभांचा धडाका पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Bhiwandi) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक सभांचा धडाका पाहायला मिळत आहे. यातच याता भिवंडीत प्रतिभा पाटील यांच्या सभेत राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
भिवंडी शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये आमदार महेश चौघुले समर्थकांनी कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवार माजी महापौर प्रतिभा पाटील यांच्या सभेत राडा घातल्याची माहिती मिळत आहे.
माजी महापौर प्रतिभा पाटील यांनी समर्थकांसह निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तक्रार दाखल करून घेण्यास विलंब करीत असल्याने नागरिकांनी गोंधळ घातला.
Summary
भिवंडीत प्रतिभा पाटील यांच्या सभेत राडा
आमदार महेश चौघुलेंच्या समर्थकांचा राडा
निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
