Rule Changes From July 1 : 1 जुलैपासून 'या' महत्त्वाच्या नियमांमध्ये होणार बदल, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
(Rule Changes From July 1 ) जून महिना संपत आला. 1 जुलै 2025 पासून, भारतात अनेक महत्त्वाचे आर्थिक नियम बदलणार आहेत. याचा थेट सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होणार आहे. यामध्ये यूपीआय पेमेंट, पॅन कार्ड अर्ज, तत्काळ तिकीट बुकींग, जीएसटी रिटर्न, क्रेडीट कार्डच्या नियमांचा असणार आहे.
एलपीजी सिलेंडर किंमत
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल विपणन कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल केले जातात. गेल्या जून महिन्याच्या तेल कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी करुन प्रति सिलेंडर 24 रुपयांपर्यंतची कपात केली होती मात्र, घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती तशाच होत्या. आता मात्र या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पॅन कार्डसाठी आधारची सक्ती
सीबीडीटीने 1 जुलै 2025 पासून आधार पडताळणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे आता नवीन पॅन कार्ड घ्यायचे असेल तर आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
तात्काळ रेल्वे तिकीट आणि भाडे
रेल्वे तिकीट दरात वाढ होणार असून नॉन-एसी मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या भाड्यात प्रति किलोमीटर 1 पैशांची, तर एसी क्लासमध्ये प्रति किलोमीटर 2 पैशांची वाढ होईल. ५०० किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी सेकंड क्लासच्या रेल्वे तिकीट दरात आणि एमएसटीमध्ये कोणताही बदल होणार नसल्याची माहिती मिळत आहे.
HDFC क्रेडिट कार्ड महागणार
एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर बँकेच्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना युटिलिटी बिल भरण्यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागू शकते. याशिवाय, एचडीएफसी क्रेडिट कार्ड वापरून डिजिटल वॉलेट्समध्ये महिन्याभरात 10 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम टाकल्यास 1 टक्के शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
UPI चार्जबॅकसाठी नवा नियम
UPI चार्जबॅकसाठी नवा नियम असणार असून बँका स्वतःहून योग्य चार्जबॅक क्लेम्स पुन्हा प्रोसेस करू शकतात, यासाठी त्यांना NPCI च्या मंजुरीची वाट पाहावी लागणार नाही.