बेळगावमध्ये बकरी ईद सणासाठी नियमावली जाहीर

बेळगावमध्ये बकरी ईद सणासाठी नियमावली जाहीर

Published by :
Published on

नंदकिशोर गावडे | येत्या बुधवारी 21 जुलैला बकरी ईद साजरी करण्यात येणार असून यानिमित्त बेळगावात काही निर्बध घालण्यात आली आहेत.

बकरी ईद येत्या बुधवार दि. 21 जुलै रोजी असून या दिवशी मुस्लिम बांधवांचे सामूहिक नमाज पठण असते. मात्र यंदा कोरोनाचे संकट असल्याने आरोग्य विभागाने नियमावली घोषित केली असून काही निर्बंध लागू केले आहेत. सामान्यपणे ईदगाह मैदानावर सामुहीक नमाज करण्याची परंपरा आहे.

नियमावली

  • मशिदीमध्ये फक्त 50 जणांनाच सामूहिक नमाज पठणाची परवानगी.
  • 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती आणि 10 वर्षे वयापेक्षा कमी वयाच्या मुलांनी घरीच नमाज पठण करावे.
  • प्रार्थना स्थळी प्रत्येकाने मास्क परिधान करणे.
  • नमाज पठण करताना दोन व्यक्ती दरम्यान 6 फूट सामाजीक अंतर असावे.
  • मशिदीत प्रवेश करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी केली जावी.
  • हात साबणाने स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर केला जावा. हात मिळविणे किंवा गळाभेट टाळावी.
  • रस्त्याच्या बाजूला, हॉस्पिटल, नर्सिंग होम, शाळा, महाविद्यालय परिसर, शाळा मैदान आणि धार्मिक स्थळांसह उद्यान तसेच सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांचा बळी देण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com