जालन्यात धावत्या ट्रॅव्हल्सच्या बसला आग

जालन्यात धावत्या ट्रॅव्हल्सच्या बसला आग

Published by :
Published on

संभाजीनगरहून जालन्याला जाणाऱ्या साईरथ ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला शनिवारी मध्यरात्री 12 वाजता अचानक आग लागली. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग लागल्याने बसचे मोठे नुकसान झाले. ही घटना जालना – संभाजीनगर महामार्गावरील वरुडी पाटी (ता. बदनापूर) जवळील गजानन महाराज मंदिराजवळ घडली.

या बाबत अधिक माहिती अशी की, संभाजीनगर येथून जालन्याला प्रवाशी घेऊन जाणारी रिकामी साईरथ ट्रॅव्हल्सची बस जालना-संभाजीनगर महामार्गावरील वरुडी शिवारातील गजानन महाराज मंदिराजवळ पोचताच बसला अचानक आग लागली. या बसमध्ये चालक – क्लिनर वगळता एकही प्रवाशी नव्हता.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. आग विझविण्यासाठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीतून पाण्याचे टँकर मागविले. तसेच जालन्याहून अग्निशमन दलाला पाचारण केले. या आगीच्या घटनेत पेटलेल्या ट्रॅव्हल्सच्या बसचे प्रचंड नुकसान झाले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com