Nanded : शेतमालाची थकबाकीसाठी रयत क्रांती आक्रमक; आत्मदहनाचा प्रयत्न

Nanded : शेतमालाची थकबाकीसाठी रयत क्रांती आक्रमक; आत्मदहनाचा प्रयत्न

शेतकऱ्यांच्या शेतमालाची थकबाकी देण्यात यावी, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

कमलाकर बिरादार, नांदेड: शेतकऱ्यांच्या शेतमालाची थकबाकी देण्यात यावी, या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नांदेड जिल्ह्यातील कुश्नूर एमआयडीसी येथील एका कंपनीने शेतकऱ्यांकडून हळद, सोयाबीन, हरभरा, इत्यादी माल खरेदी केला होता. मात्र मागील अनेक महिन्यांपासून त्याचा मोबदला शेतकऱ्यांना दिला नाही आहे. परिणामी पीडित शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलं आहे. शेतकऱ्यांनी या बाबत अनेकवेळा आवाज उठवला आहे. मात्र मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीचे संचालक उडवाउडवीची उत्तर देत आहेत. यामुळे त्रासलेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलीस प्रशासनाच्या तत्परतेने अनुचित प्रकार टळला आहे. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com