Saamana Editorial
Saamana Editorial

Saamana Editorial : महापालिका निवडणुकीच्या निकालावर सामनातून हल्लाबोल

मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Saamana Editorial) मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.29 महानगरपालिकांमध्ये भाजपा-शिवसेनेच्या महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मुंबई महानगर पालिका निवडणुकीचा निकाल हाती आला असून यामध्ये भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीने बाजी मारली असून 29 पैकी 24 पालिकांवर महायुतीची सत्ता आल्याचे पाहायला मिळत आहे.

या निकालावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता या निकालावर सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, "महाराष्ट्राच्या वैभवशाली राजधानीचे, मुंबई शहराचे भवितव्य काय? येथील मराठी माणसाला आधार कुणाचा? मुंबईचे ‘अदानीस्तान’ होत असताना या पानिपतात मराठीचा झेंडा टिकेल काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरे येणारा काळच देईल, पण ज्यांनी शिवसेना-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पीछेहाटीस हातभार लावला, त्यांनी मुंबईतील हुतात्मा स्मारकाचा सौदा केला."

"मुंबईचे ‘अदानीस्तान’ होत असताना 106 हुतात्मे फक्त अश्रू ढाळणार नाहीत, तर ते पुढच्या लढ्यासाठी याच मुंबईत पुनर्जन्म घेतील. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना व मनसेने झुंज दिली, शर्थ केली. अटीतटीची लढत झाली. ही लढाई सुरूच राहील. मुंबई व मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही!" असे सामनातून म्हटले आहे.

Summary

  • पालिका निवडणुकांच्या निकालावरुन सामनातून हल्लाबोल

  • मुंबईचे 'अदानीस्तान' होत असताना या पानिपतात मराठीचा झेंडा टिकेल काय?

  • वैभवशाली राजधानीचे, मुंबई शहराचे भवितव्य काय?- सामना

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com