Saamana Editorial
Saamana Editorial

Saamana Editorial : 'महाराष्ट्र ज्वलंत आणि जिवंत आहे हे आजची शिवतीर्थावरील विजयादशमी दाखवून देईल'; सामनातून भाष्य

आज वेगवेगळ्या पक्षांचे दसरा मेळावे राज्यात होणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • आज वेगवेगळ्या पक्षांचे दसरा मेळावे राज्यात होणार

  • शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दादर येथील शिवतीर्थ येथे होणार

  • सामनाच्या अग्रलेखातून भाष्य

(Saamana Editorial) आज राज्यात अनेक पक्षांचे दसरा मेळावे होणार आहेत. नवरात्रौत्सवात 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो.

आज शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचा दसरा मेळावा दादर येथील शिवतीर्थ येथे होणार आहे. उद्धव ठाकरे यावेळी काय बोलतात, कोणती घोषणा करतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे.

सामनातून म्हटले आहे की, देशाची लोकशाही, स्वातंत्र्य, संविधान, जनतेचा आवाज बंदिवान होऊ नये असा संकल्प भारताच्या जनतेने आजच्या दिवशी करणे हाच विजयादशमीचा विजयोत्सव आहे. मुंबईच्या शिवतीर्थावर महाराष्ट्राच्या राजधानीतून हिंदुहृदयसम्राटांनी वर्षानुवर्षे हा विचारांचा वन्ही चेतवून देशाला जाग आणली.'

'महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा कणा ताठ ठेवा', 'महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले' या सेनापती बापटांच्या ज्वलंत मंत्राला पुढे नेले. महाराष्ट्र ज्वलंत आणि जिवंत आहे हे आजची शिवतीर्थावरील विजयादशमी दाखवून देईल.' असे सामनातून म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com