Saamana Editorial
Saamana Editorial

Saamana Editorial : "निवडणुका लढायच्या आधीच विजय विकत घेणार असाल तर..." सामनातून सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल

महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Saamana Editorial ) महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. यातच निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सामनातून सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल करण्यात आला आहे. सामनातून म्हटले आहे की, "महाराष्ट्रात सत्ताधाऱ्यांची मनमानी व यंत्रणांचा उन्माद टोकाला गेला आहे. महाराष्ट्र असा कधीच नव्हता. निवडणुका लढायच्या आधीच विजय विकत घेणार असाल तर निवडणूक आयोग बरखास्त करून यापुढे निवडणुका घेऊच नका. 70 जागांवर एकही मत पडले नाही आणि तरीही तेथे सत्ताधाऱ्यांनी निवडणुका जिंकल्या."

" भाजप व त्यांच्या मित्रपक्षांनी लोकशाहीचे हे माफियाकरण केले. जेथे मते चोरता आली नाहीत तेथे दहशत व पैशांनी विरोधी उमेदवारांना माघार घेण्यास भाग पाडले. भारतीय लोकशाहीचे हे अत्यंत अपमानास्पद चित्र आहे. वेगवान मुंबईचे शिल्पकार ‘देवाभाऊ’ असल्याची होर्डिंग्ज सर्वत्र झळकली आहेत. वेगवान निवडणूक भ्रष्टाचाराचे ते शिल्पकार आहेत असे आता म्हणावे लागेल. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचे, नीतिमत्तेचे अधःपतन वेगाने सुरू झाले आहे." असे सामनातून म्हटले आहे.

Summary

  • निवडणुकांआधीच राज्यभरात एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड

  • "निवडणुका लढायच्या आधीच विजय विकत घेणार असाल तर निवडणूक आयोग बरखास्त करून यापुढे निवडणुका घेऊच नका"

  • सामनातून सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com