भाजप नेत्यांकडून आज राज्यात सभांचा धडाका

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांकडून आज राज्यात सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सायंकाळी जालन्यात जाहीर सभा घेणार आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज चार सभांचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार, जळगाव, जालना व संभाजीनगर मध्ये फडणवीसांची तोफ धडाडणार आहे.

यासोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही पुण्यात तीन ठिकाणी सभा होणार आहेत. पुण्यातील बिबवेवाडी, मार्केट यार्ड, मुकुंद नगर येथे बावनकुळे यांच्या सभा पार पडणार आहेत

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com