मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गिरणी कामगार प्रश्नावर अनुकूल! सचिन अहिरांची वर्षावर भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गिरणी कामगार प्रश्नावर अनुकूल! सचिन अहिरांची वर्षावर भेट

Published by :
Published on

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गिरणी कामगारांचा प्रश्न सोडवण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शुक्रवारी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन गिरणी कामगारांच्या तातडीच्या प्रश्नावर चर्चा केली. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई त्यावेळी उपस्थित होते

गिरणी कामगार हक्काच्या घरांचा प्रश्न समूळ सुटण्यास कालापव्यय होत आहे,तेव्हा या प्रश्नी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्वरित गिरणी कामगार कृती संघटना नेत्यांची म्हाडा आणि संबंधित अधिकाऱ्यां समवेत बैठक बोलवावी आणि हा रखडत चाललेला प्रश्न मार्गी लावावा,अशी आग्रहाची मागणी सचिन अहिर यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com