सचिन वाझेंना आज ११ वाजता कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता
अंबानी स्फोटक प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) सचिन वाझे यांना शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करीत आहे. शनिवारी सचिन वाझे यांची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर एनआयएने त्यांना अटक केली.उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला आहे. सचिन वाझे यांची जवळपास 12 तास चौकशी केल्यानंतर एनआयएने त्यांना अटक केली.
रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक केल्याची माहिती एनआयएकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटकेपूर्वी तब्बल १३ तास सचिन वाझे यांची एनआयएकडून चौकशी करण्यात आली. या १३ तासांच्या चौकशीअखेरीस एनआयएने त्यांना अटक केली. रविवारी आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांना कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. यासर्व प्रकारानंतर आता वाझेंच्या अटेकमुळे पोलीस दलात खळबळ माजली असून आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणातही वाझे यांचा सहभाग आहे का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
एनआयए मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना आज कोर्टासमोर हजर करणार आहे.वाझेंच्या अकटेनंतर मुंबई पोलिसातील बड्या अधिकाऱ्यांच्या चौकशीची शक्यतासुध्दा आहे.