Jamner : जळगावमधील जामनेरमध्ये साधना महाजन यांची बिनविरोध निवड
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Jamner) राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल येणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 02 डिसेंबर 2025 रोजी 263 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान झाले.
तर शनिवारी 23 ठिकाणी उर्वरित मतदान पार पडले. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मते मोजली जातील आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. यातच आता जामनेर नगर परिषदेमधून एकूण 27 जागा साठी ही निवडणूक झाली व एक जागा नगराध्यक्ष पदासाठी यामध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली.
मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना यांची बिनविरो निवड झाली आहे. 27 जागेसाठी नगरसेवक पदासाठी असलेले उमेदवार यातील नऊ उमेदवार देखील बिनविरोध झाले आहे. एकूण 17 जागांसाठी मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडली आहे.
Summery
जळगावच्या जामनेर नगरपरिषदेत बिनविरोध निवड
नगराध्यक्ष पदासाठी साधना महाजन बिनविरोध
साधना महाजन मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी
