मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलिसांच्या कार्याला सलाम, पोटच्या गोळ्याला सांभाळत बजावते आपलं कर्तव्य....

मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलिसांच्या कार्याला सलाम, पोटच्या गोळ्याला सांभाळत बजावते आपलं कर्तव्य....

एक आई आणि तिची बळाप्रति असलेली वेडी मायेला पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी दाटल होत. त्यांना अनेकांनी मनापासून याठिकाणी 'सॅल्यूट' ठोकला आहे.
Published by :
shweta walge

गोपाल व्यास, वाशिम; वाशिम जिल्ह्यात महिला पोलिसांनाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत रस्त्यावर उतरावे लागले आहे. चेकपोस्ट, नाकाबंदी ट्राफिक तसेच गस्तीसाठी व स्टेशन डायरीसाठी आपले कर्तव्य बजवावे लागत आहे. काही माहिला पोलीस कर्मचाऱ्यांना आपल्या पोटच्या गोळ्याला घरी ठेवून तर काहीना सोबत घेऊन रात्री उशिरापर्यंत ड्युटी करावी लागत आहे. कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही. तर बंदोबस्तामध्ये तैनात असलेल्या मायेला कधी पोटच्या बाळाला जवळ घेता येत नाही. अशी परिस्थिती पोलीस विभागात पाहायला मिळतंय तरी सुद्धा महिला पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य जे आहे. ते चोखपणे बजावत आहे.

आज असच काहीसं चित्र वाशिमच्या मालेगाव पोलिस स्टेशनमध्ये बघावयास मिळत आहे. पोलीस विभागात महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी डॅशिंग शैलीने आपली छाप सोडली आहे. अर्थात कुटुंब आणि पोटच्या गोळ्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांनी कर्तबगारी सिद्ध केल्याचं चित्र या दृश्यमध्ये त्याचे ज्वलंत उदाहरण मालेगावच्या पोलिस ठाण्यात पाहायला मिळाले. महिला पोलिस कर्मचारी वैशाली तायडे या महिला पोलीस कर्मचारी हिने आपल्या छोट्याशा बाळाला घरी न ठेवता त्याला सोबत आणून आपलं कर्तव्यही चोख बजावत आहे. एक आई आणि तिची बळाप्रति असलेली वेडी मायेला पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी दाटल होत. त्यांना अनेकांनी मनापासून याठिकाणी 'सॅल्यूट' ठोकला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com