समृद्धी महामार्ग 'या'  दिवशी राहणार बंद

समृद्धी महामार्ग 'या' दिवशी राहणार बंद

समृद्धी महामार्ग बंद राहणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

समृद्धी महामार्ग बंद राहणार आहे. समृद्धी महामार्ग 2 दिवस 4 तासांसाठी बंद राहणार आहे. पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार असल्याने या महामार्ग बंद राहणार आहे.

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. हे काम मंगळवार 21 नोव्हेंबर, बुधवार 22 नोव्हेंबर, असे दोन दिवस दुपारी 12 ते 4 या वेळात होणार आहेजालना ते छत्रपती संभाजी नगर दरम्यान दोन्ही बाजूची वाहतुक 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथे बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-14 या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होणार आहे तर शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक, सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-14 या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com