Sangli : ग्रामपंचायत निवडणुकीत शिराळा तालुक्यात 24 पैकी 18 जागांवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व

Sangli : ग्रामपंचायत निवडणुकीत शिराळा तालुक्यात 24 पैकी 18 जागांवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिराळा तालुक्यातील 24 पैकी 18 जागांवर भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळवल्याचा दावा भाजपाचे नेते सत्यजित देशमुख यांनी केला आहे.
Published by  :
Team Lokshahi

संजय देसाई | सांगली : सांगली जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकाचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी चुरशीना मतदान झाले होते. यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपा अशा पारंपारिक गटांच्या लढती पाहायला मिळाल्या होत्या. या अटीतटीच्या निवडणुकीत भाजप आणि मुसंडी मारत 24 पैकी 18 ते 19 ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व मिळवल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबतचा दावा सुद्धा भाजपा नेत्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यात आता ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा आघाडीवर गेल्याचे पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com