सांगलीत राष्ट्रवादीच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

सांगलीत राष्ट्रवादीच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

Published by :
Published on

घरगुती गॅस डिझेल-पेट्रोल इंधन दर वाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करत आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकाने डिझेल पेट्रोल इंधन दरवाढ केली असून घरगुती गॅसची ही दरवाढ भरमसाठ झाली आहे. त्यामुळे आज या दरवादीचा विरोध करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत राष्ट्रवादी कॉग्रेस महिला आघाडीच्या वतीने सांगलीमध्ये राष्ट्रवादी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com