Sangli Water Issue : ऐन दिवाळीत सांगलीत पाण्याचा ठणठणाट; संतप्त सांगलीकरांचं धरणे आंदोलन
थोडक्यात
ऐन दिवाळीत सांगलीत पाण्याचा ठणठणाट
संतप्त सांगलीकरांचं धरणे आंदोलन
दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला पाणीच नसल्याने नागरिक संतप्त
(Sangli Water Issue) दिवाळीला सुरूवात झाली आहे. यातच ऐन दिवाळीतच सांगली शहरामध्ये पाण्याचा ठणठणाट पाहायला मिळत आहे. संतप्त झालेल्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा कार्यालयाच्या दारातच हंडे आणि घागर घेऊन धरणे आंदोलन देखील केलं असून नागरिक संतप्त झालेलं पाहायला मिळत आहे.
दिवाळीतही नागरिकांना पाण्याच्या तीव्र समस्येचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी नागरीकांसह थेट महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयावर धडक दिली आहे.
महापालिका प्रशासनाकडून शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला असून नागरिकांचे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हाल झाले आहेत. दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला पाणीच नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.