सांगलीकरांना वीज वितरण कंपनीचा झटका; हाय व्होलटेजमुळे शेकडो विद्युत उपकरणे जळून खाक

सांगलीकरांना वीज वितरण कंपनीचा झटका; हाय व्होलटेजमुळे शेकडो विद्युत उपकरणे जळून खाक

Published by :
Published on

संजय देसाई, सांगली | ऐन सणासुदीच्या काळात सांगलीमध्ये वीज वितरण कंपनीच्या हाय व्होलटेजचा झटका सांगलीकर नागरिकांना बसला आहे.विजेच्या उच्च दाबामुळे टीव्ही,फ्रीज असे हजारो विद्युत उपकरण जळून खाक झाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्यामुळे वीज वितरण कंपनीकडून नुकसान पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

देशात सध्या विजेचे संकट निर्माण झालेला आहे. मात्र सांगलीमध्ये ऐन सणासुदीच्या काळात वीज वितरण कंपनीच्या झटक्याने ग्राहक मोठ्या संकटात सापडले आहे.सांगलीच्या गणेशनगरमध्ये वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामूळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.दुपारच्या सुमारास अचानक विजेचा दाब वाढला, त्यामुळे शेकडो घरातील टीव्ही, फ्रीज ,मोबाईल अशा विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहेत. अचानक पणे एकाच वेळी तब्बल 500 ते 600 ग्राहकांना याचा फटका बसला आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

या प्रभागाचे नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.आणि एमएसीबीच्या अधिकाऱ्यांना बोलावून सदर घटना निदर्शनास आणून देत तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली, त्यानंतर वीज वितरण विभागाकडून नुकसान झालेल्या ग्राहकांचे पंचनामे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com