“सर्वोच्च न्यायालय खिशात असल्याची केंद्राची भूमिका”

“सर्वोच्च न्यायालय खिशात असल्याची केंद्राची भूमिका”

Published by :

संसदेत केंद्र सरकारवर दबाव वाढवण्यासाठी विरोधी पक्षांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता बैठक बोलावली असून त्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीही सहभागी होणार आहेत. सध्या पेगॅससचं प्रकरण गाजत आहे. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत याविषयी भाष्य केलं आहे.

संसदीय अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधीपक्ष पेगॅससच्या प्रकरणावर चर्चेची मागणी करत आहे. मात्र केंद्र सरकरा याबद्दल काहीही ऐकून घ्यायला तयार नाही. या प्रकरणातील सत्य बाहेर आलं पाहीजे, असं राऊत म्हणाले.

सरकार सर्वोच्च न्यायलयाचंही ऐकत नसेल तर हे सरकार देशातले लोकशाहीचे चार स्तंभ मोडीत काढायला निघाले आहे. संसद, न्यायालय, प्रशासन आणि माध्यमं कोणाच्याही संदर्भात सरकारची भूमिका ही प्रामाणिकपणाची नाही. जर सर्वोच्च न्यायालयाचे सरकार ऐकायला तयार नसेल तर, सर्वोच्च न्यायालय आमच्या खिशात आहे, या भूमिकेत सरकार आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com