गुवाहाटीला जाण्याचा मलाही पर्यात होता, पण...; संजय राऊत

गुवाहाटीला जाण्याचा मलाही पर्यात होता, पण...; संजय राऊत

मी कपड्यांची बॅग भरून आलोय, संजय राऊतांनी ED लाच सुनावलं?
Published by :
Shweta Chavan-Zagade

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) कोसळलं आणि भाजपच्या मदतीने शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र मी शिवसेनेचाच मुख्यमंत्री असल्याचा दावा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांकडून केला जातो. हा दावा खोडून काढत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे.

गुवाहाटीला जाण्याचा मलाही पर्यात होता, पण...; संजय राऊत
Bhavana Gawali | सईद खानला ED न्यायालयाकडून जामीन

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची तब्बल नऊ तासापासून ईडीकडून चौकशी सुरू होती. महाराष्ट्रातील राजकीय ड्रामा सुरू असतानाच राऊत यांना ईडीचं दुसरं समन्स आलं होतं. त्यांचा अलिबाग दौरा असल्याने चौकशीच्या समन्सला प्रत्युत्तर दिलं होतं. अखेर राज्यात नवं सरकार आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राऊत यांनी सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयात हजेरी लावली. पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना नोटीसा पाठवल्या होत्या.

'मी बॅग भरून आलो आहे, असं ईडी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं'

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने काल संजय राऊत यांची काल तब्बल १० चौकशी केली. या चौकशीबाबत बोलताना राऊत म्हणाले की, 'काल मला भाजपच्या एका शाखेने चौकशीसाठी बोलावलं होतं. माझ्याकडेही गुवाहाटीला जाण्याचा पर्याय होता, मात्र मी ईडी चौकशीला सामोरे गेलो. सत्य तुमच्या बाजूने असेल तर घाबरण्याचं कारण नाही. मी बॅग भरून आलो आहे, असं ईडी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं.'

'जिथे ठाकरे तिथे शिवसेना'

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे. या दाव्यावरून संजय राऊत यांनी शिंदे गटाला फटकारलं आहे. 'आमदार आणि खासदार निवडून आणण्याची ताकद शिवसेनेत आहे. शिवसैनिक कोणत्याही दबावाला आणि मोहाला बळी पडणार नाही. राज्यसभा निवडणुकीत मलाही पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र पराभूत झालो असतो तरी मी शिवसेनेतून बाहेर पडलो नसतो. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, ही दोन्ही नावे एकाच नाण्याच्या बाजू,' असं राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com