Sanjay Raut : "राज्यात 1 कोटी बोगस मतदार"; खासदार संजय राऊतांचा आरोप
थोडक्यात
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला
"राज्यात 1 कोटी बोगस मतदार"
"देशाचं लक्ष वेधण्यासाठी 1 नोव्हेंबरचा मोर्चा"
(Sanjay Raut) संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, "4 दिवसांमध्ये साडे सहा लाख मतदार वाढवले गेले. अमित शाह दोन दिवसांपूर्वी दिल्लीत म्हणतात आम्ही घुसखोरांना शोधून काढू.
"घुसखोर जर मतदार यादीत असतील तर आम्ही त्यांना मतदार यादीतून हाकलून देऊ. महाराष्ट्रामध्ये 1 लाख बोगस मतदार हे घुसखोर आहेत. असे आम्ही मानतो. मतदार यादीतील घोटाळा जो पर्यंत आहे तो पर्यंत निवडणुका पारदर्शक होणार नाहीत. राज्यात 1 कोटी मतदार बोगस असताना निवडणुकीचा निकाल पूर्ण या बोगस मतदारांच्या हातामध्ये आहे. "
"देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगावर 1 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केलं. तशी काल घोषणा झाली. काल शिवसेना भवनातल्या पत्रकार परिषदेला सर्व पक्षीय नेते हजर होते. मनसेचे सर्व नेते हजर होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं जयंतराव पाटील होते." असे संजय राऊत म्हणाले.