Sanjay Raut on Manikrao Kokate : "ही हिट विकेट, कोकाटे यांनी स्वत:च खड्ड्यात उडी मारली"
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sanjay Raut on Manikrao Kokate) माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. सदनिका गैरव्यवहार प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा आणि 10 हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयात कायम ठेवण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली ही शिक्षा, जिल्हा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवला आहे.
या न्यायालयीन निर्णयामुळे कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला असून आता या खात्याचा पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणार आहे. नाशिक पोलिसांना माणिकराव कोकाटेंच्या अटक वॉरंटची प्रत प्राप्त झाली असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार असल्याची माहिती मिळत आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "कोणाला वाचवायचा प्रयत्न होतो आहे. ज्या विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या 40 आमदारांच्या अपात्रतेच्याबाबतीमध्ये जो तडकाफडकी निर्णय घेतला. सुनील केदार यांच्याबाबतीत तडकाफडकी निर्णय घेतला. वेगळी केस नाही आहे. महाराष्ट्रातल्या अजित पवार गटातल्या एका मंत्र्याला दोन वर्षाची शिक्षा होऊनसुद्धा ते अद्याप मंत्रीपदावर कायम आहेत."
"कोकाटे ही हीट विकेट आहे. कोकाटे यांनी स्वत:च खड्ड्यात उडी मारली आहे. त्यांची केस ही आताची नाही आहे ना. योग्य वेळी ती बाहेर आली. ते कसब फडणवीसांमध्ये नक्कीच आहे. कोकाटेंना वाचवण्यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे. अमित शाह काल धनंजय मुंडेंना भेटले हा तो संदेश आहे. काही करा आणि आमच्याकडे या. आम्ही तुमच्या पाठिशी आहोत." असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Summery
माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत
संजय राऊत यांची प्रतिक्रिया
'कोकाटेंना वाचवण्याचा प्रयत्न सुरु
