Sanjay Raut : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला

Sanjay Raut : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाला

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला.
Published on

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, देशामध्ये इतकं पुतळं उभे आहेत. अगदी कन्याकुमारीच्या समुद्रात असतील, अमेरिकेच्या समुद्रात असतील. मुंबईच्या चौपाटीवर आहेत. रंकाळा तलावात आहे. पाण्यामध्ये असंख्य पुतळे आहेत.

जेव्हा वादळ येत तेव्हा लोकांची घरं उद्धवस्त होतात, झाडे पडतात, वृक्ष पडतात, समुद्रात बोटी बुडतात. तसं काहीचं झाल्याचे दिसत नाही फक्त पुतळा पडला.

यासोबतच ते म्हणाले की, पुतळा पडला याचा अर्थ पुतळा पोकळ भ्रष्टाचाराने पोखरलेला चौथरा, कोट्यवधी रुपये खाल्लेलं आहेत. त्याच्यावरती खरं म्हणजे याची चौकशी करण्यासाठी विद्यमान न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली एक SIT स्थापन करा. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com