Sanjay Raut
Sanjay Raut

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गट आणि मनसे 'या' ठिकाणी एकत्र लढणार; संजय राऊत यांनी थेट सांगितले...

"या क्षणी 2 ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या" असे संजय राऊत म्हणाले
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली

  • "आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार"

  • "या क्षणी 2 ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या"

(Sanjay Raut) संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, "काल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे शिवाजी पार्कच्या व्यासपीठावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्रमुख आणि त्यांचे बंधू राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सांगितले की, आम्ही एकत्र राहण्यासाठीच एकत्र आले आहोत. हे तुमच्या डोक्यात पक्कं करा. हे जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख किंवा मनसेचं प्रमुख सांगतात. तेव्हा ते पुन्हा एकत्र आले, पुन्हा एकत्र आले हो बोलणं योग्य नाही. काल जो शिवतिर्थावर दीपोत्सव झाला तो दीपोत्सव गेले 14 वर्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून होत आहे आणि ते मुंबईचं आकर्षण आहे हे नक्कीच. काल त्याचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले."

" राज आणि उद्धवजी यांनी मराठी जनतेला अभिवादन केलं. काल ज्या प्रकारचा दीपोत्सव आणि आतषबाजी आकाशात झाली. ही आतषबाजी आणि हा अशाप्रकारचा दीपोस्तव मराठी आणि महाराष्ट्राच्या जीवनामध्ये अनंतकाळासाठी येवो ही सगळ्यांनी भावना आहे आणि त्याला सुरूवात झालेली आहे. यापुढे महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या प्रत्येक प्रश्नात आणि संघर्षात राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्रितपणे काम करतील आणि मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला वैभवाचे दिवस प्राप्त करुन देतील हे या दीपोत्सवाचा संदेश आहे."

यासोबतच ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं प्रमुख राज ठाकरे हे दोघं या क्षणी एकत्र आहेत. मुंबई आणि मराठी माणूस वाचवण्यासाठी आणि हा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. मुंबई कोणाच्या हातात तुम्ही देणार आहात? तुम्ही पुणे कोणाच्या हातात देणार आहात? ठाणे कोणाच्या हातात देणार आहात? आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार, आमचाही नारा 75 पार आहे. दोन ठाकरे सब पे भारी. या क्षणी 2 ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या. दोन ठाकरेंनी ठरवले तर मुंबईतील रस्ते बंद होतील. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com