Sanjay Raut : महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणं हा धोका

संजय राऊत हे माध्यमांशी संवाद साधत होते.
Published by :
Siddhi Naringrekar

संजय राऊत हे माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी महाविकास आघाडीतील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणं हा धोका आहे. या महाराष्ट्राने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे साहेबांचं काम पाहिलं.

यासोबतच ते म्हणाले की, लोकसभेतलं मतदान अनेक घटकांचे हे माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे पाहूनसुद्धा झालेलं आहे. अर्थात तिघांची ताकद एकत्र होती. बिन चेहऱ्यांचे महाविकास आघाडी किंवा बिन चेहऱ्याचे सरकार हे अजिबात चालणार नाही. लोक स्विकारणार नाही. लोकांना चेहरा द्यावाच लागेल. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com