Sanjay Raut
महाराष्ट्र
Sanjay Raut : "अजित पवार यांनी भाजपची साथ सोडावी आणि..."; संजय राऊत यांची प्रतिक्रिया
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेतली.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sanjay Raut) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेतली. अजित पवार यांच्या या पत्रकार परिषदेवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, "अजित पवार यांनी भाजपची साथ सोडावी आणि मूळ राष्ट्रवादी पक्षात विलीन व्हावं. अमित शाहांना दिलेला पक्ष त्यांच्या हातातून मूळ राष्ट्रवादी नाही आहे."
" मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सन्माननीय शरद पवार साहेबांचा आहे. मूळ शिवसेना ही माननीय उद्धव ठाकरे साहेबांची आहे. पण अमित शाहांच्या मस्तीमुळे हे दोन्ही पक्ष दुसऱ्यांच्या हातात त्यांनी ठेवले." असे संजय राऊत म्हणाले.
