शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन; शेगावात भक्तांना न येण्याचे आवाहन

शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन; शेगावात भक्तांना न येण्याचे आवाहन

Published by :
Published on

शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचे शेगाव येथे निधन झाले. कोरोनाच्या निर्बंधांमुळे शेगावात भक्तांनी येऊ नये असं आवाहन संस्थानने केले आहे. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत होईल, असं कळवण्यात आलेलं आहे.

मागील तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. मात्र, त्यांनी 'मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका' असं सांगितलं होतं.  त्यांच्यावर घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या देखरेखीखाली उपाचार सुरू होते.

दरम्यान त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे व मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत होईल, असं कळवण्यात आलेलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com