Santosh Dhuri
Santosh Dhuri

Santosh Dhuri : भाजपचा मनसेला मुंबईत मोठा धक्का; संतोष धुरी भाजपमध्ये करणार प्रवेश

येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Santosh Dhuri) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

यातच आता भाजपने मनसेला मुंबईत मोठा धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे. नाराज मनसे नेते संतोष धुरी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मनसे नेते संतोष धुरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठं खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे.

काल रात्री मंत्री नितेश राणे आणि संतोष धुरी यांच्यात गुप्त भेट झाली असल्याची माहिती मिळत आहे. आज दुपारी 1 वाजता संतोष धुरींचा पक्ष प्रवेश होणार आहे. संतोष धुरी यांना वॉर्ड क्रमांक 194 मधून उमेदवारी हवी होती. त्यामुळे संतोष धुरी नाराज होते. आज त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.

Summary

  • भाजपचा मनसेला मुंबईत मोठा धक्का

  • मनसेचे नेते नाराज संतोष धुरी भाजपच्या गळाला.

  • आज दुपारी 1 वाजता संतोष धुरी भाजपमध्ये करणार प्रवेश

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com