Uddhav Thackeray - Raj Thackeray - उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या 'या' तारखेपासून संयुक्त सभा
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Uddhav Thackeray - Raj Thackeray ) येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.
महापालिका निवडणुकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यातच अनेक दिवस राज ठाकरे - उद्धव ठाकरे यांची युती कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पत्रकार परिषदेतून ठाकरे बंधू यांनी त्यांच्या युतीची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या संयुक्त सभांचं नियोजन सुरू करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पाच तारखेपासून संयुक्त सभा होणार असून पश्चिम उपनगर पूर्व उपनगर आणि शिवाजी पार्क येथे तीन सभा होणार आहेत. कल्याण मध्ये एक, डोंबिवली मध्ये एक आणि मीरा भाईंदर मध्ये एक सभा घेण्यात येणार असून नाशिकला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एक सभा होणार आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या देखील वेगवेगळ्या सभा होणार आहेत.
Summary
उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पाच तारखेपासून संयुक्त सभा
पश्चिम उपनगर पूर्व उपनगर आणि शिवाजी पार्क मुंबईत तीन सभा होणार
कल्याण मध्ये एक, डोंबिवली मध्ये एक आणि मीरा भाईंदर मध्ये एक सभा
