अपहार प्रकरणी वर्षभराच्या संघर्षानंतर चिमठाणे ग्रामपंचायतीच्या सरपंचावर गुन्हा दाखल
धुळे जिल्ह्यातील महत्वाची ग्रामपंचायत चिमठाणा या ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार वर्षभरापूर्वीच झाली होती. ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे आता उघड झाले आहे. गट विकास अधिकारी यांच्याकडे सर्वात पहिल्यांदा तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नंतर थेट विभागीय आयुक्त कार्यालयात चिमठाणे ग्रामपंचायतीच्या अपहार आणि अनियमितता यासाठी लढा सुरू होता.
चौकशी दरम्यान तत्कालीन तीन ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई झाली होती मात्र सरपंचांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नव्हती. तक्रारदार शिवसेना नेते भरत पारसिंग राजपूत यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण करण्यात यावे मागणीसाठी लढा सुरू ठेवला. लेखापरीक्षण झाल्याने अहवाल प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायत चिमठाणा येथे अनियमितता झाल्याचे उघड झाले.
ग्रामसेवकांवर कारवाई झाली.
मात्र सरपंचवर कोणतीही कारवाई होत नव्हती आज अखेर विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार चिमठना ग्रामपंचायतीच्या सारपंचवर शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळपास पाच लाखांचा अपहार आणि आर्खिक अनियमितता असल्याचे स्पष्ट झाले. तरी येणाऱ्या काळात लेखपरिषणात कोट्यवधी रुपयांचा सिद्ध होईलच, असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच आज गुन्हा दाखल झालेल्या सरपंचावर अपात्रतेची कारवाई व्हावी, ही मागणीला जोर धरू लागली आहे.

