ससून रुग्णालय ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण; हळनोर याने महिला आणि 2 व्यक्तींचे नमुने घेतल्याची माहिती

ससून रुग्णालय ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात हळनोर याने महिला आणि 2 व्यक्तींचे नमुने घेतल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

ससून रुग्णालय ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात हळनोर याने महिला आणि 2 व्यक्तींचे नमुने घेतल्याची माहिती मिळत आहे. डॉ. सापळे समितीच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ससून मध्ये संबंधित विभागातील डॉक्टरांनी अल्पवयीन कार चालकाचे ब्लड सँपल घेतले होते. मात्र ऐनवेळी आलेल्या खासगी इसमांनी संबंधित डॉक्टरांवर दबाव टाकत हे ब्लड सँपल बदलण्यास भाग पाडल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून त्या तीन व्यक्तीची चौकशी केली जाणार आहे. डॉ. हळनोरनी ब्लड सॅम्पल घेतलेल्या 'त्या' 3 व्यक्ती कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com