ललित पाटीलप्रकरणी सरकार अ‍ॅक्शन मोडवर;  ससूनच्या कर्मचाऱ्यांसह डीनही चौकशीच्या फेऱ्यात

ललित पाटीलप्रकरणी सरकार अ‍ॅक्शन मोडवर; ससूनच्या कर्मचाऱ्यांसह डीनही चौकशीच्या फेऱ्यात

ड्रग्स माफिया ललित पाटील पलायनप्रकरणी सरकार आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. ससून हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसह डीन, वैद्यकीय अधीक्षकाचीही चौकशी केली आहे.

पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील पलायनप्रकरणी सरकार आता अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. ससून हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसह डीन, वैद्यकीय अधीक्षकाचीही चौकशी केली आहे. राज्य सरकारच्या चौकशी समितीकडून ही चौकशी करण्यात आली आहे.

ललित पाटीलप्रकरणी सरकार अ‍ॅक्शन मोडवर;  ससूनच्या कर्मचाऱ्यांसह डीनही चौकशीच्या फेऱ्यात
Samruddhi Highway Bus Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 10 ते 12 जणांचा मृत्यू

ससून प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून स्थापित समितीने चौकशी सुरु केली आहे. यामध्ये रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक, कक्ष क्रमांक 16 मधील कर्मचारी यांचा देखील समावेश आहे. तसेच, 2022 पासून आतापर्यंत ससूनमध्ये दाखल झालेल्या प्रत्येक कैदी रुग्णाची माहिती समितीने सादर करण्यास सांगितले आहे. राज्य सरकारच्या या चौकशी समितीने वॉर्ड क्रमांक 16 मधील शिपायांची देखील कसून चौकशी केली.

दरम्यान, ससून रुग्णालयातील ड्रग्स तस्करी प्रकरण नुकतेच पुणे पोलिसांनी उघड केले होते. पुणे पोलिसांच्या गुन्हा शाखेने ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला होता. या ड्रग्स प्रकरणात येरवडा कारागृहातील कैदी ललित पाटील सामील होता. या ललित पाटीलवर जून महिन्यापासून ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. हे प्रकरण उघड होताच तो पसार झाला. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com