महाराष्ट्र
…अन् सौताडा येथील रामेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागला!
मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे सौताडा येथील रामेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागला आहे.सौताडा येथे खोल दरीत श्री.रामेश्वराचे मंदिर आहे. शंभर फुटापेक्षा जास्त उंच धबधब्यावरुन कोसळणारे पाणी पर्यटकांना भुरळ घालत आहे.
उंच कड्यावरून दरीत झेपावणारा हा जलप्रपात पाहण्यासाठी बीड जिल्ह्यासह पश्चीम महाराष्ट्रातील पर्यटक या ठिकाणी येत असतात.दरम्यान, तब्बल दीड महिन्यांच्या दडी मारलेला पाऊस महाराष्ट्रात परतला आहे. या पावसाने शेतकर्यांना दिलासा तर खरीपाला जीवदान मिळाले आहे.