School Bus
महाराष्ट्र
School Bus : राज्यातील स्कूल बस चालकांचा संप तुर्तास मागे
राज्यातील स्कूल बस चालकांनी आजपासून बेमुदत संपाची घोषणा केली होती.
(School Bus ) राज्यातील स्कूल बस चालकांनी आजपासून बेमुदत संपाची घोषणा केली होती. महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली होती. मात्र आता राज्यातील स्कूल बस चालकांचा संप तुर्तास मागे घेण्यात आला आहे.
तर इतर वाहतूक संघटनांचा संप दोन दिवसांनी पुढे ढकलला असल्याची माहिती मिळत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्कूल बस संघटनांसोबत बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची या बैठकीत प्रमुख उपस्थिती असणार आहे.
सकाळी दहा वाजता वर्षा निवासस्थानी स्कूल बस संघटनांसोबत बैठक होणार असून या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत काय आश्वासन मिळते यावर स्कूल बस आणि प्रवासी वाहतूक संघटनांच्या संपाची पुढील दिशा ठरणार असल्याची माहिती मिळत आहे.