Beed : मनोज जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील शाळा आज बंद
Beed : बीड येथे आज मनोज जरंगे पाटील यांची इशारा सभा होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने मोठी तयारी करण्यात आली आहे. एकूण शंभर एकरात ही सभा पार पडणार असून यासाठी लाखो मराठा समाज बांधव उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. जरांगे सभास्थळी पोहोचल्यावर त्यांच्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी कालावधी दिला होता. तो कालावधी उद्या संपत आहे त्यामुळे या सभेत मनोज जरांगे पाटील काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. या सभेसाठी तब्बल पाच लाख लोकांची गर्दी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मनोज जरांगे हे दुपारी दोनच्या सुमारास बीडमध्ये सभास्थळी पोहचतील.
याच पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या सभेला होणारी गर्दी पाहता बीड शहरातील आज सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. सभेसाठी होणारी मोठी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त तैनात केला आहे.