महाराष्ट्र
School Reopen | राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा ओमिक्रॉन व्हेरीएंट सापडला आहे. या नव्या व्हेरीएंट नंतर शाळा पुन्हा बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.मात्र या नुसत्या चर्चाच असून येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाकडून याबाबत नियमावली जारी करण्यात आली आहे.
कोरोनाचा नवीन व्हेरियंट आल्याने शाळा पुन्हा बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र या निव्वल चर्चा आहेत. शिक्षण विभाग शाळा सूरू करण्याबाबत सकारात्मक आहे. राज्यात येत्या 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. ग्रामीण भागात 1 ली ते 4 थीचे वर्ग सूरू होणार आहेत. तर 1 ते 7 चे वर्ग 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. शिक्षण विभागाकडून शाळांबाबत नियमावली जारी करत सुरक्षितपणे वर्ग सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

