नागपूरमध्ये ग्रामीण भागातील शाळा 26 जानेवारीपर्यंत बंद

नागपूरमध्ये ग्रामीण भागातील शाळा 26 जानेवारीपर्यंत बंद

Published by :

कल्पना नळसकर, नागपूर | नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व शाळा 26 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी घेतला आहे. जिल्हयातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने स्थानिक प्रशासनाने निर्णय घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील कोरोनाचा वाढत्या संसर्गाचा आढावा घेत, नागपूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागातील सर्व शाळा तूर्तास 26 जानेवारी पर्यंत बंदच असतील, असे योगेश कुंभेजकर यांनी सांगितले. तसेच 26 जानेवारी नंतर कधी शाळा उघडायचा हा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेली माहिती व जिल्हा टास्क फोर्सने अलीकडेच व्यक्त केली चिंता तसेच दररोज वाढत असलेली रुग्ण संख्या लक्षात घेता 26 जानेवारी पर्यंत सर्व शाळा बंद राहतील असा निर्णय घेण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com