Omicron Varient | प्रतापगडावर कलम 144 लागू, यंदाचा ‘शिवप्रताप दिन’ साधेपणाने

Omicron Varient | प्रतापगडावर कलम 144 लागू, यंदाचा ‘शिवप्रताप दिन’ साधेपणाने

Published by :
Published on

प्रशांत जगताप, सातारा | छत्रपती शिवरायांच्या अनेक गाथांमधील एक गाथा सांगितली जाते, ती म्हणजे प्रतापगडावरील (अफजलखानाचा वध. या शौर्यानिमित्त हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी शिवप्रताप दिनी कलम 144 लागू करण्यात आली आहे. हे आदेश दिनांक 10 डिसेंबर 2021 रोजी रात्री 12 वाजल्यापासून लागू करण्यात येणार असल्याची माहिती महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील यांनी दिली.

महाबळेश्वर तालुक्यामध्ये 10 डिसेंबर 2021 रोजी शिवप्रताप दिन उत्सव साजरा होणार आहे. त्या उद्देषाने नागरिक एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिवप्रताप दिनानिमित्त काही निर्बंध घालण्यात आली आहेत.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षी साजरा करण्यात येणारा शिवप्रताप दिन अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावा. तसेच शासनाने वेळोवेळी दिलेले नियमांचे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन पार पाडणे आवश्यक आहे. महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार आदेश जारी केले आहेत. हे आदेश दिनांक 10 डिसेंबर 2021 रोजी रात्री 12 वाजल्या पासून लागू राहतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com