Ambad Police station
Ambad Police station

लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; शिक्षणाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Published by :

किरण नाईक, नाशिक | नाशिकमध्ये खासगी क्लास घेणाऱ्याच्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार (sexual harassment) केल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेने शिक्षणाधिकाऱ्यावर (education officer) हा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी (education officer) प्रविण आहिरे यांच्याविरोधात अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडीत महिलेच्या तक्रारीनुसार अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police station) हद्दित तिचे पती खासगी क्लास चालवतात. त्याचवेळी महिलेला तिचा पती त्रास देत होता. नवर्‍याची तक्रार करण्यासाठी ही महिला तत्कालिन प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रविण अहिरे यांच्याकडे गेली होती. यावेळी पिडीत महिला आणि त्यांची एकमेकांशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर भेटीगाठींमध्ये झाले.

यानंतर मलाही पत्नीला घटस्फोट द्यायचा असून त्यानंतर आपण लग्न करु, असे आश्वासन अहिरे यांनी महिलेला दिले होते. ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०२२ या कालावधीत अहिरे यांनी लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार केला लग्न करण्यास टाळाटाळ करत शिवीगाळ व ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत महिलेने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रविण आहिरे यांच्याविरोधात अंबड पोलिसांत (Ambad Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com