Shahapur
महाराष्ट्र
Shahapur : शहापूरमधील R.S दमानिया स्कूल प्रकरण; फरार आरोपींच्या शोधासाठी 4 पथके तैनात
महाराष्ट्राला लाजवणारी एक धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील तालुका ठिकाण असलेल्या शहापूरमधून समोर आली आहे.
(Shahapur) महाराष्ट्राला लाजवणारी एक धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील तालुका ठिकाण असलेल्या शहापूरमधून समोर आली आहे. येथील आर. एस. दमानिया विद्यालयातील काही विद्यार्थिनींना मासिक पाळी आल्याचा संशय घेत विवस्त्र करून तपासणी करण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
या अमानुष प्रकारामुळे संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत मुख्याध्यापिकेला चोहोबाजूंनी घेरले आणि स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
कल्याण न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र 48 तास झाले तरीही संस्था चालक आणि एक शिक्षिका अद्यापही फरार आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी 4 पथके तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.