Shaktipeeth Mahamarg
Shaktipeeth Mahamarg

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी राजू शेट्टी यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल

शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Shaktipeeth Mahamarg ) शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. यावर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शक्तीपीठ महामार्ग विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यामध्ये राजू शेट्टी यांच्यासह माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजू बाबा आवळे, शिवसेनेचे नेते विजय देवणे यांच्यासह 400 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र बंदीचे आदेश असतानाही जमाव एकत्र करून महामार्ग रोखल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

या शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यातील बारा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला, पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन केले. आता कोल्हापूरच्या शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com