Sharad Pawar : शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस; शुभेच्छा देण्यासाठी आज पक्षातले नेते आणि कार्यकर्ते भेट घेणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sharad Pawar) शरद पवार यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पक्षातले नेते पदाधिकारी कार्यकर्ते पोहचत असताता. सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत.
वाढदिवसानिमित्त त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पक्षातले नेते आणि कार्यकर्ते त्यांची भेट घेतील. त्या निमित्ताने शरद पवार आज सकाळी 10 ते 12 यावेळेत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये उपस्थित राहणार आहेत.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 10 तारखेला दिल्लीत स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अजित पवार देखील उपस्थित होते. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
Summery
शरद पवारांचा आज 85 वा वाढदिवस
शुभेच्छा देण्यासाठी पक्षातले नेते, कार्यकर्ते घेणार पवारांची भेट
सकाळी 10 ते 12 या वेळेत शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राहणार उपस्थित
