Sharad Pawar - Ajit Pawar : शरद पवार-अजित पवार एकाच मंचावर येणार; कारण काय?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sharad Pawar - Ajit Pawar) पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. यातच आता पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर एकत्र येणार आहेत.
बारामतीत 17 जानेवारीला कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आहे. याच्याआधी 28 डिसेंबरला बारामतीत शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर एकत्र आले होते. 17 ते 24 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यपालांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून शरद पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, रोहित पवार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.
Summary
शरद पवार-अजित पवार एकाच मंचावर येणार
बारामतीत 17 जानेवारीला कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
राज्यपाल यांच्या हस्ते होणार कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
