Sharad Pawar - Ajit Pawar : पवार काका-पुतणे आज पुन्हा एकत्र येणार; कारण काय?
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sharad Pawar - Ajit Pawar) शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची माहिती मिळत आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी ११ वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणार आहे.
या सर्वसाधारण सभेसाठी अजित पवार आणि शरद पवार आज एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळणार आहे. सभेसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार ,बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे कृषिमंत्री व संस्थेचे विश्वस्त नियामक मंडळ उपस्थित राहणार आहेत.
यातच पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची माहिती मिळत असून जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. काल रात्री उशीरापर्यंत अजित पवारांच्या निवासस्थानी बैठका सुरू होत्या. आज आघाडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
पवार काका-पुतणे आज पुन्हा एकत्र
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 49वी वार्षिक सर्वसाधारण सभा
सभेसाठी शरद पवार, अजित पवार एकत्र येणार
