महाराष्ट्र
इडा पीडा टळू दे, शरद पवार साहेबांचे राज्य येऊ दे; बॅनरची चर्चा
आज गोविंद बागेत पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम होणार आहे.
आज गोविंद बागेत पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी रात्री श्रीनिवास पवार यांच्या घरी दिवाळीच्या निमित्ताने स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
गेल्या अनेक वर्षापासून शरद पवारांच्या गोविंद भगिनी निवासस्थानी दिवाळी पाडव्याला येत असतात. आज देखील दिवाळी पाडव्याच्या निमित्त पंढरपूर मधील राष्ट्रवादी पवार कुटुंब यांना भेटण्यासाठी आले असता त्यांच्या हातातील बॅनर हा सगळीकडे चर्चेचा विषय ठरला.
या बॅनरवर "इडा पिडा टळू दे पवार, साहेबांचं राज्य येऊ दे" अशा आशयाचा बॅनर हातात घेऊन आल्याने सगळीकडे या बॅनरची चर्चा सुरू झाली आहे.