Sanjay Raut : शरद पवार यांना केंद्राकडून झेड प्लस सुरक्षा; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
शरद पवार यांना केंद्राने झेड प्लस सुरक्षा दिली आहे. आजपासून सीआरपीएफचे दहा जवान शरद पवारांसोबत असणार आहे. यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, माननीय शरद पवार साहेबांना केंद्राची सुरक्षा आहे. याचा अर्थ महाराष्ट्राच्या पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही. जर तुम्हाला माननीय शरद पवार साहेब यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते आहे. याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस हे जसं आमच्या मुलीबाळींचे रक्षण करु शकत नाहीत. त्याच पद्धतीने आमचे जे प्रमुख नेते आहेत. राज्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी म्हणून केंद्राची सुरक्षा दिली.
ज्या नेत्याची लोकप्रियता आहे, जो नेता आपला पराभव करु शकतो. त्या नेत्याला अडकवून ठेवायचे. त्याच्या मनावरती दबाव आणायचा. त्याची माहिती घ्यायची. यासाठी अशाप्रकारची सुरक्षेची व्यवस्था होत असते. पण तरीही केंद्राने सुरक्षा दिला हा महाराष्ट्रातील पोलीस यंत्रनेचा अपमान आहे. असे संजय राऊत म्हणाले.