पुण्यात भर पावसात शरद पवार गटाचं आंदोलन, सुप्रिया सुळे महायुती सरकारवर कडाडल्या

पुण्यात भर पावसात शरद पवार गटाचं आंदोलन, सुप्रिया सुळे महायुती सरकारवर कडाडल्या

बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक आत्याचाराची घटना घडली. या घटनेचे सर्वच ठिकाणी तीव्र पडसाद उमटत आहेत.
Published by :
shweta walge
Published on

बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक आत्याचाराची घटना घडली. या घटनेचे सर्वच ठिकाणी तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक सामाजिक कार्यकर्ते, संघटना तसंच राजकीय पक्षांकडून या घटनेचा निषेध करण्यात येतोय. तर पुण्यामध्ये आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं आहे.या आंदोलनात शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर, यांच्यासह अन्य नेते सहभागी झाले होते. यावेळी भर पावसात सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यावेळी सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार हल्ला केला. ही मोठ्या आंदोलनाची सुरुवात आहे. आपणास खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, असे सुप्रिय सुळे यांनी सांगितले.

सुप्रिय सुळे म्हणाल्या की, मोठ्या आंदोलनाची ही फक्त सुरुवात आहे, आपणास सुरक्षितेसाठी मोठे काम करायचे आहे. गाव, वाडी, वस्तीवर जाऊन काम करायचे आहे. दौंडमध्ये काल मी गेले. त्या ठिकाणी घडलेली घटना पाच ते सहा वर्षांपूर्वीची आहे. आता लोक पुढे येत आहे. त्यामुळे त्या पालकांना धीर देण्याची गरज आहे. कोणत्याही कार्यकर्त्यांनी त्या मुलींच्या घरी जाऊ नये. त्यांची ओळख बाहेर येऊ देऊ नये. आपण महाराष्ट्रातील मुलींच्या सुरक्षेसाठी कामाला लागू या. तसेच जोपर्यंत त्या व्यक्तीला फाशी होत नाही, तोपर्यंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाही. बदलापूर आंदोलनात बाहेरची लोक होती, असे सत्ताधारी म्हणत होते, मात्र बाहेरचे लोक असले तरी घटनेचा निषेध महत्वाचा आहे.

गुंडांना आता पोलिसांची भीती राहिली नाही. कोयता गँग, रक्त नमुने बदलणे अशा घटना पुण्यात घडल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणत होते पुणे जिल्ह्यात एका अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला फाशी दोन महिन्यांत आहे. पुण्यात असा प्रकार घडला असेल तर आपण मुख्यमंत्र्याचा जाहीर सत्कार करू या. सरकार असंवेदनशील आहे. सरकारचा आणि त्या कृतीचा आपण निषेध करतो.

पुढे त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पुण्यात बलात्कार झालेल्या प्रकरणात दोन महिन्यांत आपण त्या नराधमाला फाशी दिली. असं झालं असेल तर आपण सगळे जाहीरपणे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ. प्रत्येक गोष्टीत गलिच्छ राजकारण आणायचं. इतकं असंवेदनशील सरकार मी आजपर्यंत पाहिलं नाही”,

शक्ती कायदा आम्ही आणला हे राज ठाकरे यांना माहिती नसेल,राज ठाकरे फार संवेदनशील आहेत,भाजप ने पण आंदोलन केल होती,आपली लोकशाही आहे दडपशाही नाही,सत्ताधारी विरोध विरोधक अस आंदोलन केलं पाहिजे,कोणी सत्तेत असो आंदोलन केल तर त्याला टीका नाही केली पाहिजे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com