महाराष्ट्र
Sharad Pawar : नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाला शरद पवार जाणार नाहीत
शरद पवारांना सरकारकडून उद्घाटनाचं निमंत्रण नाही
थोडक्यात
आज नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन
शरद पवारांना सरकारकडून उद्घाटनाचं निमंत्रण नाही
शरद पवार आज कार्यक्रमाला जाणार नाही
(Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 8 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. या नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमाला शरद पवार यांना निमंत्रण दिले नसल्याची माहिती मिळत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनाचं निमंत्रण शरद पवार यांना आले नसल्याचे शरद पवार यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे शरद पवार या कार्यक्रमाला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.